Recipes in Marathi

साहित्य
१ वाटी तुरीची डाळ - कुकरमधे मऊ शिजवलेली
१ लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन.
१ छोटा खडा गुळ,
चवीप्रमाणे मीठ, कांदा-लसुण मसाला,
२ मध्यम लसूण पाकळ्या, थोडे ओले खोबरे , कोथिंबीर - बारीक कुटुन,
तेल आणि फोडणीचे सामान

कृती -
तेल तापवून नेहेमीप्रमाणे फोडणी करायची. फोडणी छान तडतडली म्हणजे त्यात चिंचेचा कोळ घालायचा. त्यात कांदा-लसुण मसाला, लसुण-खोब~याचा गोळा, गुळ घालुन १ वाटीभर पाणी घालायचे. आता हा कोळ साधारण मध्यम आचेवर झाकुन ५ मिनीटे छान उकळू द्यावा. त्यात आता मीठ घालुन परत २-३ मिनीटे उकळावे. गॅस बारीक करुन शिजवलेली डाळ घोटुन घालावी. गॅस मध्यम करुन झाकण न लावता आमटी ५-६ मिनीटे उकळू द्यावी. गरम भाताबरोबर अप्रतीम लागते.

टीप - कांदा लसुण मसाला नसेल तर प्रमाणात गोडा मसाला आणि लाल तिखट वापरले तरी छान लागते.

साहित्य -

२ वाट्या आंबटसर दही किंवा ३-४ वाट्या ताक,   तिखट, मीठ,  आले १ इंच, ३-४ लसूणपाकळ्या,  मोहरी, हिंग, कडीपत्ता,  हळद मेथीचे १०/१२ दाणे, थोडी साखर, मोहरी, जिरे, तेल. बेसन १ वाटी

कृती -

दही तीन वाट्या पाणी घालुन चांगले घुसळून घ्यावे. आले,लसूण वाटून घालावे. तिखट, मीठ साखर चवीप्रमाणे घालावे. हे कढीचे मिश्रण झाले. आता फोडणीत मोहरी, हिंग, कडीपत्ता,  हळद मेथीचे १०/१२ दाणे टाकून फोडणी तडतडली कढी टाकुन एक उकळी येईपर्यंत गरम करणे.
नंतर मिश्रणाला बेसन लावून ती कढी उकळावी. कढी पातळसरच हवी.   एक दोन उकळ्या देऊन गॅस बंद करावा. भात, पोळी, पराठ्यांसोबत चविष्ट लागते. ह्यात शेवगाच्या शेंगा - किंवा - वांगी किंवा - काकडी घातली तरी छान लागते.

साहित्य

१ वाटी भाजलेले दाणे
१ चमचा साजूक तूप, १ तिखट मिरची
२ चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे खवलेला ओला नारळ
१ चमचा जिरे, अर्धी वाटी चिंचेचे दाट पाणी
गूळ छोट्या सुपारीइतका
चवीपुरते मीठ


कृती -
१ वाटी भाजलेल्या दाण्याची साले काढून मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेणे. नंतर त्यात पाणी घालून मिक्सरमधेच गंधासारखे बारीक वाटून घेणे. तूपजिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मिरचीचे तुकडे व गंधासारखे बारीक झालेले दाण्याचे मिश्रण घालून त्यात चिंचेचे पाणी, गूळ, कोथिंबीर, ओला नारळ व चवीपुरते मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालणे व उकळी आणणे. पातळ/दाट ज्याप्रमाणे आमटी आवडते त्यानुसार पाणी घालणे.

साहित्य
लाल मध्यम आकाराचे टोमॅटो ४ ते ५, लाल तिखट, धने-जीरे पूड, साखर प्रत्येकी अदपाव चमचा
मीठ, जीरे, मोहरी, हिंग, तेल १ चमचा
१ कमी तिखट असलेली हिरवी मिरची
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ प्रत्येकी २-३ चमचे

कृती -
टोमॅटो अर्धे चिरुन कूकरमधे शिजवणे. गार झाल्यावर शिजलेल्या टोमॅटोची साले काढून टाकणे. नंतर शिजलेले टोमॅटो २-३ चमचे ओला नारळ व १ मिरची मिक्सरमधून एकजीव करून घेणे. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण एका पातेलीत काढून त्यात तिखट, धनेजीरे पूड, मीठ व साखर घालणे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालणे. नंतर कढल्यात तेल घालून त्यात मोहरी, जिरे व हिंग टाकून फोडणी करून टोमॅटोच्या मिश्रणामधे घालणे व एक उकळी येईपर्यंत गरम करणे.
लाल तिखट, धने जीरे पूड व साखर चवीप्रमाणे कमी/जास्त घालावी. जास्त नको, स्वाद येण्यापुरतीच. जास्त तिखट चव नको. गरम गरम पिणे. ओला नारळ पण दाटपणा येण्यापुरताच, जास्त नको.

साहित्य

चण्याचे पीठ १ वाटी , तेल एक वाटी,  लसूण ७-८ पाकळ्या, तिखट २ चमचे, पाणी ४ वाट्या.
मीठ चवीनुसार , कोथिंबीर शोभेकरीता.

कृती चण्याचे पीठ, तिखट, मीठ पाण्यात मिसळून, एकजीव करून ठेवा. (गुठळ्या राहाता कामा नये). लसूण पाकळ्या सोलून चॉप करून घ्या. (गव्हा एवढे बारीक तुकडे करून घ्या) कढईत तेल तापवा. तेल तापले की त्यात चॉप केलेला लसूण टाकून चांगला लाल होईपर्यंत तळून घ्या. आता गॅस बारीक करा.  आता त्यात चण्याचे पीठ, तिखट आणि मीठ मिसळलेले पाणी हळूहळू ओता. एका हाताने ढवळत राहा. पिठले घट्ट होऊन तेल सूटू लागले की गॅस बंद करून, वरून कोथिंबीर भुरभुरा . पिठले तयार.

हे पिठले गरम गरम भाकरी बरोबर मस्त लागते.  सोबत  कांदा विसरायचा नाही.

साहित्य -  शिजलेली तुरीची डाळ १ वाटी, तेल, फोडणीचे साहित्य(मोहरी,हिंग,हळद) फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची, मटार दाणे, वांगे, श्रावणघेवडा, बटाटा
बारीक चिरलेला कांदा मूठभर, २ बारीक चिरलेले टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या चिंचेचे दाट पाणी लहान १ वाटी, गुळ थोडासा,मीठ  बारीक चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ अर्धी वाटी, लाल तिखट, गरम मसाला, सांबार मसाला, धने-जीरे पूड प्रत्येकी १ चमचा

कृती -  नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालून फोडणी करावी. फोडणीमधे लाल तिखट, धने-जिरेपूड, गरम मसाला, सांबार मसाला, (आवडीप्रमाणे कमीजास्त प्रमाणात) कोथिंबीर, ओला नारळ, चिंचेचे पाणी, थोडा गूळ, चवीपुरते मीठ, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो व वरील सर्व भाज्या जाड चिरुन (२-३ वाट्या) अथवा आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालून व थोडे पाणी घालून शिजवणे. चांगली दणदणीत उकळी आली पाहिजे इतके शिजवणे.

भाज्या जाड चिरणे हे महत्वाचे. फक्त कांदा व टोमॅटो बारीक चिरणे. नंतर शिजलेली तुरीची डाळ डावेने एकजीव करून उकळलेल्या भाज्यांच्या मिश्रणात घालून व चवीपुरते मीठ व पाणी घालून (सांबार ज्या प्रमाणात दाट/पातळ हवे त्याप्रमाणात पाणी घालावे) परत एक चांगली उकळी आणावी.

असे हे तिखट, आंबटगोड भाज्यांचे सांबार इडली, डोसे किंवा गरम भाताबरोबर गरम गरम खावे.

साहित्य -  २ टोमॅटो, तेल, मोहरी, हळद, मीठ तिखट आणि कांदा लसुण मसाला, हरभरा डाळीचे पीठ

कृती - टोमॅटो बारिक वा मध्यम आकारात कापुन घ्यावा एका खोलग़ट भांड्यात. त्यावर पिठल्याला हव्या असलेल्या चवीचे मीठ पसरावे आणि थोडावेळ झाकुन ठेवावे (टोमॅटोला चांगले पाणी सुटे पर्यंत.)

कढईत फ़ोडणी करावी. त्यात टोमॅटो आणि त्याला सुटलेले पाणी टाकावे. मग त्यात तिखट आणि कांदा लसुण मसाला टाकुन परतावे. जे पातळ मिश्रण होइल त्यात हरभरा डाळीचे पीठ पेरावे आणि घट्ट होइ पर्यंत परतावे. गरम गरम खावे - सोबत भाकरी वा पोळी. पटकन होणारा सोपा पदार्थ, कधी ही करता येतो.

फोडणी साठी साहित्य - तेल, कढीपत्ता, हिंग, हळ्द, जिरे, मोहरी.
इतर साहित्य - गोडा मसाला, मिठ, लाल तिखट, ओले खोबरे-कोथींबीर वाटण, थोडा चिंचेचा कोळ, थोडे पुरण.

कृती -  कट, वाटण, चिंच, पुरण, मिठ, तिखट, मसाला एकत्र करुन उकळायला ठेवावे. पाणी कमी जास्ती बघावे. कारण जसजशी आमटी उकळते तसे पाणी घालावे लागते. सधारण १५ ते २० मिनिटे उकळले की मग त्यात खमंग फोडणी घालावी आणि एक उकळी आणावी.

साहित्य -
१ वाटी हरभऱ्याची डाळ, १ कांदा, २ टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचे तुकडे, ४ मिरे, ३ लवंगा, दालचिनी तुकडे २, १ चमचा धणे, ४ लसूण पाकळ्या, मीठ, सुके किसलेले खोबरे, चवीनुसार गूळ.

कृती - कांदा सालीसकट गॅसवर भाजा. खोबऱ्याचा कीस भाजा. दोन्ही वाटून घ्या. मिरे व लसूण तेलात परतून घ्या. इतर मसाला, मिरे, लसूण वाटून घ्या. शिजलेल्या डाळीत खोबऱ्याचा मसाला, लसणीचा मसाला घाला. मीठ, पाणी, खोबऱ्याचे तुकडे घालून आमटी चांगली उकळा. चवीनुसार गूळ घाला. वरून हिंग-हळदीची फोडणी द्या. ही कोकणी आमटी भाताबरोबर खूपच छान लागते

साहित्य -
एका लिंबाएवढी चिंच, चिंचेच्या तिप्पट गूळ, ६-७ वाट्या पाणी, अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचे कूट, पळीभर तुपाची फोडणी, मीठ चवीपुरते, कोथिंबीर अर्धी वाटी, एक चिमूट जिरे.

कृती -  प्रथम चिंचेचा कोळ काढून, त्यात सहा वाट्या पाणी घालावे. त्यात तिप्पट गूळ चिरून घालावा व ढवळून विरघळू द्यावा. चवीपुरते मीठ घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचे कूट घालावे. वरून हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून केलेली खमंग फोडणी द्यावी. हे सार न उकळता थंडच वाढायचे असते.

कर्नाटकात भोगीच्या दिवशी गरम-गरम भाताच्या खिचडीबरोबर हे सार करण्याची पद्धत आहे.

हे सार कच्चे व थंड असले, तरी भरपूर तिळकुटामुळे ते उष्णतावर्धक व अतिशय चविष्ट लागते.

 

Send your Comments

Name
Email
Comment
 
 

 

 

Soup Recipes

Related Articles